Tuesday, July 28, 2009

ही कागदाची होडी - by Sandeep Khare

ही कागदाची होडी

ही कागदाची होडी या झ-यात सोडून दिली न
ती याच अपेक्शेने
की असही होऊ शकेल
की झ-यातून नदी पर्यन्त,
नदीतून खाडीपर्यन्त
आणि खाडीतून समुद्रापर्यन्त जाऊ शकेल ही होडी !
कदाचित पूर्ण भिजणार नाही हिचा कागद
समुद्राशी पोहोचेपर्यन्त
आणि समुद्रातल्या तुफ़ान लाटानाही
लळा लावून तरन्गत राहील ही...
कडाडतील वीजा...लाटान्चे डोन्गर होतील
ख-याखु-या जहाजन्ची शिड फ़ाटून जातील
पण तरीहि या चिमुकलीच गोडुल अस्तित्व
प्रलयावर तरन्गणा-या पिम्पळपानासारख डुलत राहील!
भाबडीच आहे ही आशा
पण शेकडो वर्षाच्या वडापिम्पळाच्य
जमिनीखलि वसाहत केलेल्या मुळासरखि
सजीव आणी लासट...

होडी कगदाचीच आहे...
पण त्यावर लिहिली आहे
सारा जन्म पणाला लावून रसरसलेलीअ
एक कविता....

म्हणून तर
ही कागदाची होडी
या झ-यात सोडून दिली ना
ती...याच...तयारीने.....की....

(नेणीवेची अक्षरे)

No comments: