Tuesday, November 9, 2010

Marathi Jokes

शिक्षक: एक भिंत बांधायला १०००० रुपये खर्च येतो तर २ भिंती बांधायला किती खर्च येईल?
विद्यार्थी: १०० करोड.
शिक्षक: नालायक, तुझ्या बापाच नाव काय?
विद्यार्थी: सुरेश कलमाडी.
----------


बाजारातून पत्नी स्वत:साठी dress घेऊन येते. जो खूपच पारदर्शक असतो.
पती (चिडून): हे काय कसला ड्रेस आणलास? यातून आरपार दिसतेय.
पत्नी: तुम्ही किती भोळे आहात, अहो जेव्हा मी हा ड्रेस घालीन तेव्हा कसं आरपार दिसेल?
----------

Psychology चा तास चालू होता
सरांनी उंदीराच्या एका बाजूला केक आणि दुसरया बाजूला उंदरीण ठेवली.
उंदीर लगेच केककडे धावला.
सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली, पुन्हा तोच प्रकार.
सरांनी पदार्थ बदलून पहिले, उंदीर प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला.

सर: यावरून हे सिद्ध होत कि या जगात भुकेपेक्षा मोठ काही नाही.
एवढ्यात पक्क्या ओरडला, "सर, एवढे पदार्थ बदललेत एकवेळ ती उंदरीण पण बदलून बघायची ना."
------------
गोपाळराव आपल्या पत्नीला रागानं म्हणाले, "अगं, आज विसूनं माझ्या पॅंटाच्या खिशातले काही पैसे चोरलेले दिसतात! कुठं गेलं ते पोरटं?"
पत्नी: कमाल आहे तुमच्या अविचारीपणाची! त्या लेकरावर कशाला उगाच चोरीचा खोटा आळ घेता? मी कशावरून तुमच्या पॅंटच्या खिशात हात घातला नसेन?
गोपाळराव: तू नक्कीच खिशात हात घातलेला नाहीस, कारण त्यात ...अजून थोडेसे पैसे शिल्लक आहेत.
----------

गुरुजी : मुलानो आपली मराठी भाषा फार लवचिक आहे, वळवावी तशी वळते.
बोलता बोलता गुरुजींच लक्ष खिडकीतून बाहेर बघणाऱ्या पप्या कडे गेलं.
गुरुजी: पप्या, लक्ष कुठाय? मी काय सांगितलं आता?

पप्या (गडबडून): मराठी भाषा वळावी तशी वळते.
गुरुजी: उदाहरण दे.
पप्या: मुले अंधारात चुका करतात ... आणि अंधारात चुका झाल्या कि मुले होतात.

----------
लाईट आल्यावर खोलीतील देशस्थ आणि कोकणस्थ कसा ओळखावा?
लाईट आल्यावर "आले" म्हणून आनंदाने चित्कारतो तो देशस्थ, ... आणि जो लगेच मेणबत्तीवर फुंकर मारतो तो कोकणस्थ.
----------
शिक्षक: एका गाढवा पुढे 1 दारुचा आणी 1 पाण्याचा ग्लास ठेवला, पण गाढव पाणीच प्यायला, तर सांगा यापासुन तुम्ही काय शिकलात?
चिंटू: जो दारु पित नाही तो गाढव असतो.

----------

वडील: अरे, एक काळ असा होता, की मी पाच रुपयांत किराणासामान, दूध, पाव आणि अंडी घेऊन यायचो.
मुलगा: आता ते शक्य नाही, बाबा! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय!

----------
रजनीकांत स्वर्गाच्या दारात उभा होता, लंच टाईम असल्यामुळे चित्रगुप्त जेवायला गेला, म्हणून यम स्वतः दारात उभा होता, यमाने रजनीकांतला लगेच ओळखला,
यम: तू रोबोट चा हिरो रजनीकांत ना रे.
रजनीकांत (मस्करीत): नाही मी टायटानिकचा हिरो लिओनार्डो डीकॅप्रिओ.
यम (गोंधळून): अरे चित्र्या, टायटानिक बुडाली होती कि जळाली होती?
----------
वडील: मुला, यशस्वी असणे तेव्हा म्हणतात जेव्हा तुमची signature हि Autograph मध्ये बदलते.
मुलगा: नाही बाबा, यशस्वी असणे तेव्हा म्हणतात जेव्हा तुमची signature हि chevas regal किंवा black label मध्ये बदलते.

----------