Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts

Monday, July 1, 2013

Marathi Funny Nibandh...SHEPUT

Marathi Funny Nibandh...SHEPUT
click open in new tab to view...or open in new window
click to zoom ...view larger ...really funny

Thursday, June 16, 2011

First Gear

I dont know who have written this but its worth reading, i got this in mails, first class



स्मरण फर्स्ट



त्या दिवशी गाडी चालवत होतो. मुंबईत गाडी चालवायची म्हणजे क्लच, ब्रेक आणि गिअर बरोबर झटापट ही आलीच. बदलत जाणारे गिअर्स आणि त्यामुळे बदलत जाणारा गाडीचा वेग यावरून एक कल्पना सुचली.
गाडी सुरु झाल्यावर तिला पुढे नेण्यासाठी आपण 'फर्स्ट गिअर' टाकतो. हा 'फर्स्ट गिअर' म्हणजे आपल्या जवळची सख्खी माणसं. आई-बाबा, जोडीदार, मुलं, जवळचे मित्र...
हा पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. मुंगीच्या गतीने का होईना गाडी न थांबता 'पुढे' जात राहिली पाहिजे हा पहिला 'संस्कार' फर्स्ट गिअर करतो.
इथे आपल्याला unconditional प्रेम मिळतं, सुरक्षितता मिळते. गाडी 'बंद पडणार नाही' याची पुरेपूर काळजी हा फर्स्ट गिअर घेतो. परंतु गाडी 'पळण्यासाठी' इतका कमी वेग पुरेसा नसतो.
आपण गाडीचा वेग वाढवतो. सेकंड गिअर टाकतो ! इथे आपल्याला घराबाहेरचं विश्व कळू लागतं.
शाळा, कॉलेज, पुस्तकं, मिडिया, आपले छंद, विविध कला..... बाहेरचं जग किती मोठं आहे आणि माहिती आणि ज्ञानामुळे हेच मोठं जग किती जवळ आलं आहे, हे कळतं.

समोर पसरलेला संधीचा आणि प्रगतीचा रस्ता आता आपल्याला खुणावू लागतो.


गाडीचा वेग आणखी वाढवण्यासाठी आपण आता थर्ड गिअर टाकतो. गाडीचा वेग आणखी वाढतो. हा थर्ड गिअर म्हणजे आपला नोकरी धंदा आणि त्यातून मिळणारं विना-खंडित उत्पन्न. गरजे पुरतं घर, कपडा लत्ता, भांडीकुंडी, पहिला फ्रीज, पहिला टीव्ही, प्रसंगानुरूप हॉटेलिंग, सणासुदीलानवीन कपडे, चांगले मार्क मिळाले तर मुलाला/मुलीला सायकल वगैरे थर्ड गिअरमध्ये येतं. या गिअरमध्ये आपण बऱ्यापैकी स्थिरावतो. गाडीचा वेग ना कमी ना जास्त. सेकंड मधून थर्ड गिअर मध्ये आलो तेव्हा वेग जास्त होता हे मान्य, पण आता तोच वेग कमी वाटू लागतो.आपण आता 'फोर्थ गिअर' टाकतो. गाडी सुसाट निघते. मनात आलं कीहॉटेलिंग-शॉपिंग-मल्टीप्लेक्स, गाडी, latest मोबाईल, 1 BHK मधून 2 BHK, laptop, ह्याउ नि त्याउ..!या वेगाची नशाच काही और! गम्मत म्हणजे आपण पाचव्या गिअर मध्ये कधी जातो हे आपल्यालाच कळत नाही... आता गाडी अक्षरश: तरंगत जात असते. हजार... लाख... कोटी... खर्व.... निखर्व...... रुपये नाहीत, गरजा!


हा 'वेग' खूप आनंददायी असतो. आपल्या गाडीच्या आड कोणी येऊ नये, ' लाल' सिग्नल लागू नये असं मनोमन वाटत असतं....



आणि... आणि.....आणि...



... ‘नियतीनावाचा एक स्पीडब्रेकर समोर येतो. तो खूप प्रचंड असतो.



गाडी थांबवण्यावाचून आता पर्याय नसतो. पाच.. चार.. तीन..दोन...एक....


खाट खाट गिअर मागे टाकत आपण आता neutral वर येतो. कचकावून ब्रेक लागतात. गाडी पूर्ण थांबते. आपल्या अंगाला खूप मोठा झटका बसतो.


पाचव्या गिअर मध्ये गाडी असताना आपण कधी काळी फर्स्ट गिअर देखील टाकला होता याचा विसर पडला होता. वरचा प्रत्येक गिअर टाकताना त्या गिअरची अशी एक मानसिकता होती...आज एक एक गिअर मागे येताना हे पहिल्यांदा जाणवलं.गाडी आता पूर्ण थांबली आहे. गाडी आता पुढे न्यायची आहे.. मला सांगा कुठला गिअर टाकाल?सुसाट वेगाचा पाचवा गिअर?


की मुंगीच्या वेगाचा पण गाडी चालू ठेवेल असा 'फर्स्ट गिअर'?


आयुष्यात जेव्हा पराभवाचे, निराशेचे क्षण आले होते, तेव्हा कोण होतं तुमच्या जवळ? कोणी दिला होता आधार ? आठवून पहा. प्लाज्मा टीव्हीने? EMI भरत विकत घेतलेल्या extra बेडरूमने? नव्या कोऱ्या गाडीने? 'You are promoted' असं लिहिलेल्या कागदाने?मी सांगतो कोण होतं तुमच्याजवळ. तुम्हाला आधार दिला होता फर्स्ट गिअरने!



आर्थिक अडचणीच्या वेळी आपल्या उशाखाली नोटांचं पुडकं हळूच ठेवून जाणारे बाबा, निरागस प्रश्न विचारून आपल्या चिंता घालवणारी आपली चिमुरडी मुलं, 'होईल सगळं व्यवस्थित' म्हणत डोक्याला बाम चोळून देणारी 'बायको'नावाची मैत्रीण, बाहेरचं खाऊन त्रास होऊ नये म्हणून पहाटे उठून पोळी भाजीचा डबा बनवणारी आई, 'त्या' काळात आपल्या Frustration चाकानहोणारे आणि योग्य सल्ला देणारे जिवाभावाचे मित्र हे सगळे फर्स्ट गिअर तुमची गाडी ओढत नव्हते का?



Don't Get Me Wrong.



माझा चवथ्या-पाचव्या गिअर्सना आक्षेप नाही.



त्या वेगाची धुंदी जरूर अनुभवूया. त्याचा आनंदही उपभोगुया. फक्त त्यावेळी आपल्या 'फर्स्ट गिअर्स' चं स्मरण ठेवूया.आयुष्याचा वेग मधून मधून थोssडा कमी करत पुन्हा एकदा फर्स्ट गिअरवर येऊया.सुसाट वेगाचा 'arrogance' इथे नाही... गाडी थोडी हळू चालेल हे मान्य. 'फर्स्ट गिअरचं' अस्तित्व लक्षात घ्यावंच लागेल असा हा वेग असेल.त्या निवांतपणाशी थोडं खेळूया आणि मग टाकूया पुढचा गिअर!जाता जाता आणखी एक.



स्वत:लाच एक प्रश्न विचारूया...



दुसऱ्या कुणाच्या आयुष्याचा मी बनू शकेन का फर्स्ट गिअर’?

Thursday, May 5, 2011

Master key - Marathi

Click on image to view larger , it will open in new window,











Click on image to view larger , it will open in new window,

Thursday, March 10, 2011

Marathi Joke

Malkin - kay ge.. 3 diwsapasun kamala nahi aalis, tehi na sangta?
Molkarin - ohh madam.. face book var status update karun gele hote ki gavala jatey mhanun...................sahebanni comment pan dili ki 'come soon.. Miss U!!'

Monday, December 13, 2010

Maitri - Marathi

I dont know who have created this beautiful poem,
but i received this in mail so i have posted here, ENJOY

मैत्री.

कमळ पत्रा वरील पाण्याला कधी थांब म्हणायच नसत नीसटणार्या क्षणांना कधी जवळ करायच नसत माणसाच आयुष्य हे असच असत बाकी काही हरवल तरी त्यापेक्षाही जास्त उरलेल असत.

काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात
कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात.

मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्त आपली असते,
ती मैत्री.....................................................

Tuesday, November 9, 2010

Marathi Jokes

शिक्षक: एक भिंत बांधायला १०००० रुपये खर्च येतो तर २ भिंती बांधायला किती खर्च येईल?
विद्यार्थी: १०० करोड.
शिक्षक: नालायक, तुझ्या बापाच नाव काय?
विद्यार्थी: सुरेश कलमाडी.
----------


बाजारातून पत्नी स्वत:साठी dress घेऊन येते. जो खूपच पारदर्शक असतो.
पती (चिडून): हे काय कसला ड्रेस आणलास? यातून आरपार दिसतेय.
पत्नी: तुम्ही किती भोळे आहात, अहो जेव्हा मी हा ड्रेस घालीन तेव्हा कसं आरपार दिसेल?
----------

Psychology चा तास चालू होता
सरांनी उंदीराच्या एका बाजूला केक आणि दुसरया बाजूला उंदरीण ठेवली.
उंदीर लगेच केककडे धावला.
सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली, पुन्हा तोच प्रकार.
सरांनी पदार्थ बदलून पहिले, उंदीर प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला.

सर: यावरून हे सिद्ध होत कि या जगात भुकेपेक्षा मोठ काही नाही.
एवढ्यात पक्क्या ओरडला, "सर, एवढे पदार्थ बदललेत एकवेळ ती उंदरीण पण बदलून बघायची ना."
------------
गोपाळराव आपल्या पत्नीला रागानं म्हणाले, "अगं, आज विसूनं माझ्या पॅंटाच्या खिशातले काही पैसे चोरलेले दिसतात! कुठं गेलं ते पोरटं?"
पत्नी: कमाल आहे तुमच्या अविचारीपणाची! त्या लेकरावर कशाला उगाच चोरीचा खोटा आळ घेता? मी कशावरून तुमच्या पॅंटच्या खिशात हात घातला नसेन?
गोपाळराव: तू नक्कीच खिशात हात घातलेला नाहीस, कारण त्यात ...अजून थोडेसे पैसे शिल्लक आहेत.
----------

गुरुजी : मुलानो आपली मराठी भाषा फार लवचिक आहे, वळवावी तशी वळते.
बोलता बोलता गुरुजींच लक्ष खिडकीतून बाहेर बघणाऱ्या पप्या कडे गेलं.
गुरुजी: पप्या, लक्ष कुठाय? मी काय सांगितलं आता?

पप्या (गडबडून): मराठी भाषा वळावी तशी वळते.
गुरुजी: उदाहरण दे.
पप्या: मुले अंधारात चुका करतात ... आणि अंधारात चुका झाल्या कि मुले होतात.

----------
लाईट आल्यावर खोलीतील देशस्थ आणि कोकणस्थ कसा ओळखावा?
लाईट आल्यावर "आले" म्हणून आनंदाने चित्कारतो तो देशस्थ, ... आणि जो लगेच मेणबत्तीवर फुंकर मारतो तो कोकणस्थ.
----------
शिक्षक: एका गाढवा पुढे 1 दारुचा आणी 1 पाण्याचा ग्लास ठेवला, पण गाढव पाणीच प्यायला, तर सांगा यापासुन तुम्ही काय शिकलात?
चिंटू: जो दारु पित नाही तो गाढव असतो.

----------

वडील: अरे, एक काळ असा होता, की मी पाच रुपयांत किराणासामान, दूध, पाव आणि अंडी घेऊन यायचो.
मुलगा: आता ते शक्य नाही, बाबा! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय!

----------
रजनीकांत स्वर्गाच्या दारात उभा होता, लंच टाईम असल्यामुळे चित्रगुप्त जेवायला गेला, म्हणून यम स्वतः दारात उभा होता, यमाने रजनीकांतला लगेच ओळखला,
यम: तू रोबोट चा हिरो रजनीकांत ना रे.
रजनीकांत (मस्करीत): नाही मी टायटानिकचा हिरो लिओनार्डो डीकॅप्रिओ.
यम (गोंधळून): अरे चित्र्या, टायटानिक बुडाली होती कि जळाली होती?
----------
वडील: मुला, यशस्वी असणे तेव्हा म्हणतात जेव्हा तुमची signature हि Autograph मध्ये बदलते.
मुलगा: नाही बाबा, यशस्वी असणे तेव्हा म्हणतात जेव्हा तुमची signature हि chevas regal किंवा black label मध्ये बदलते.

----------

Wednesday, October 27, 2010

marathi Jokes

मुलगा - आपल्या शेजारी ती नवीन बाई राहायला आली आहे तिचे नाव डार्लिंग आहे का?
आई - नाही बेटा
मुलगा - तू जेव्हा भाजी आणायला गेली होतीस तेव्हा पप्पा तिला डार्लिंग
डार्लिंग म्हणून हाक मारत होते

________________________________________


पाईप पाईप
पोर पोर
पाईप
...
पोर
पाईप
पोर
आता तुम्ही विचार करत असाल,कि हा काय प्रकार आहे....???
.
.
.
.
.
.
अहो काही नाही हो...
नेपाली त्याचा फोन नंबर देत आहे...
"५५४४५४५४"

________________________________________

नेपोलियन - माझ्या dictionary मध्ये impossible हा शब्दच नाहीयेत.
गण्या - आता रडून काय फायदा ? विकत घेतली तेंव्हाच चेक करायला हवे होते.

________________________________________

आत्महत्येचे दोन मार्ग
झटपट आत्महत्या : एक मोठा दोर घ्या. गळ्यात अडकवा. छताला लटका! .
.
.
.
....
.
.
.
.
.
.
.
.
.
....
रमतगमत आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या. ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा!!!!
________________________________________
गण्या बस स्टॉपवर उभा होता.
एक मोटरसायकलस्वार त्याच्यापाशी आला आणि त्याने विचारले, '' लिफ्ट हवी आहे का?"
.
.
'गण्या- ''नो थँक्स! माझे घर तळमजल्यावरच आहे!!
________________________________________

एक बच्चा बहुत देर से रो राहा था
मां ने पुछा"मेले लाल को क्या चाहिये???". . . toffee biscuit या chocolate ? ? ?
अभी बच्चे का जवाब सुनो... . . its too gud.
..
. .
. . .
बच्चा : बस एक सनम चाहिये ए ए ए आशिकी के लिये...!!!

________________________________________

वडील : अरे, एक काळ असा होता, की मी पाच रुपयांत किराणासामान, दूध, पाव
आणि अंडी घेऊन यायचो...
मुलगा : आता ते शक्य नाही, बाबा! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय!!

________________________________________

शिक्षक : एका गाढवा पुढे 1 दारुचा आणी 1 पाण्याचा ग्लास
ठेवला, पण गाढव पाणीच प्यायला, तर सांगा यापासुन तुम्ही काय शिकलात?

चिंटू : जो दारु पित नाही तो गाढव असतो.
________________________________________

प्रपोज करण्याची नवीन पद्धत.
मिकू : तुझं नाव गूगल आहे का?
चिंकी : नाही ..का?
मिकू : मी जे जे शोधत होतो ते सगळं तुझ्यात आहे म्हणून विचारलं....

________________________________________

मुलगा : मी माझ्या गर्लफ़्रेंड ला गेली ३ वर्षे दररोज पत्रं पाठवली.
मित्र : मग ? काय झालं शेवटी ?
मुलगा : तिनं पोस्टमनशी लग्न केलं !

________________________________________


टीचर : या ओळीचे इंग्लिशमध्ये भाषांतर करा. त्याने त्याचे काम केले आणि
तो ते करतच राहिला.
संता : ही डन हिज वर्क अँड डन डना डन डन डना डन...

________________________________________

सिंड्रेलाचं आवडतं गाणं कोणतं ??
.
...
.
.
.
.
.
.
.
मला जाऊ द्या न घरी ....................आता वाजले कि बारा....

________________________________________

सगळ्या अमेरिकन मुलांची नाव,
जॅकसन
विलसन
मार्कसन
रोबिनसन
केनसन
जॉनसन
डेविडसन
जेमसन
सॅमसन
अशी का असतात?
कारण त्यांच्या आयांना लक्षात ठेवायला बर पडत कि कोणाचा बाप कोण आहे ते..

________________________________________

कधी कधी मला प्रश्न पडतो, सर्व हिलस्टेशन इतक्या उंचावर का बांधतात??..
.
.
.
....
.
गंपू: कदाचित, स्वतहाच्या 'honey' ला 'moon' जवळुन दाखवता यावा म्हणुन...

________________________________________


एका स्टेशन वर ट्रेन थांबते..
Passenger: कोणते स्टेशन आहे?
Platform वरचा माणूस: अरे टवळ्या, बाहेर येऊन बघ की स्वत: ..आळशी नुसता
बसल्या जागी पाहिजे सगळं..डोळे फुटले का तुझे?
....
.
.
Passenger: अरे वा पुणे आलं की !! :D :D

________________________________________

सकाळ सकाळ जोशी काका पेपर वाचत बसलेले असतात
तेवढ्यात जोशी काकू येऊन लाडाने म्हणतात.....
"अहो काल आपले डॉक्टर सांगत होते...माझा B .P . वाढला आहे म्हणून...
तर B .P . म्हणजे नक्की काय हो ?"
...जोशी काका ताडकन उत्तर देतात .." बावळट पणा !!! "

________________________________________

एकदा एक पाटील आंघोळ करताना शाम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता..
बायको : अव्हा.. हे काय करताय ? शाम्पू डोक्यालाच लावायचा असतू....
पाटील : आग येडे ...हा काय...साधा शाम्पू ...नाही..., हा तर head &
shoulder आहे.......

Tuesday, July 20, 2010

ka ka ka ka - kavita

केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये 'कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले.
काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श किंचाळून कलकलाट केला.
काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.
कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी 'कोलाज' करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला. काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.
कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.
केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.
कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला 'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!
कथासार
-
क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,
कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे
लेखक : कु शंतनू भट
मूळ दुवा : http://shantanubhat.blogspot.com/2009/02/blog-post.html

Wednesday, April 21, 2010

हे भलते अवघड असते

... संदीप खरे ...

हे भलते अवघड असते

गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन् ओले
गाडी सुटली, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले
गाडी सुटली, हातामधुनी हात कापरा तरी सुटेना
अंतरातली ओली माया तुटूदे म्हटले तरी तुटेना
का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते
गाडी गेली फलाटावरी नि:श्वासांचा कचरा झाला
गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला

हे भलते अवघड असते... हे भलते अवघड असते...
कुणी प्रचंड आवडणारे... ते दूर दूर जाताना...
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना...
डोळ्यातील अडवून पाणी... हुंदका रोखुनी कंठी...
तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते...

तरी असतो पकडायाचा... हातात रुमाल गुलाबी...
वार्‍यावर फडकवताना... पाह्यची चालती गाडी...
ती खिडकीतून बघणारी अन् स्वतः मधे रमलेली...
गजरा माळावा इतुके... ती सहज अलविदा म्हणते...

तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू...
इतक्यात म्हणे ती - माझ्या कधी गावा येशील का तू?
ती सहजच म्हणुनी जाते... मग सहजच हळवी होते...
गजर्‍यातील दोन कळ्या अन् हलकेच ओंजळीत देते...

कळते की गेली वेळ... ना आता सुटणे गाठ...
आपुल्याच मनातील स्वप्ने... घेऊन मिटावी मूठ...
ही मूठ उघडण्यापूर्वी... चल निघुया पाऊल म्हणते...
पण पाऊल निघण्यापूर्वी... गाडीच अचानक निघते...

परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी...
ओठावर शीळ दिवाणी... बेफिकीर पण थरथरती...
पण क्षण क्षण वाढत असते... अंतर हे तुमच्यामधले...
मित्रांशी हसतानाही... हे दु:ख चरचरत असते...

हे भलते अवघड असते….

किती झाले ?

रात्री बायको बरोबर गाडी वरुन घरी जाताना
ती खोडकर आवाजात सांगू लागते
आमच्याच घरच्या खाणाखूणा...
' हां.. आता इथून डावीकडे... आता सरळ..
त्या मारुती पासून उजवीकडे वळा..
थोडी पुढे घ्या अजुन... पांढर्‍या गेटपाशी थांबवा...
हां... बास बास... इथेच... '
आणि मग उतरत, पर्स काढत
विचारते हसत हसत - ' हां... किती झाले ? '

८४ लक्ष तर झालेच की प्रीये !
हा तरी शेवटचा की नव्या जन्मवर्तुळाचा हा प्रारंभ ... ठाउक नाही !
गतजन्माचे आठवत नसेलही काही आपल्याला,
पण तेंव्हाही असतील असेच तुझे जन्मप्रामाणिक हसरे क्षण
आणि माझे अंतःस्थ उदासीन प्रश्न काही !!

आता पर्स काढलीच आहेस तर ठेव हातावर
एखादी साखरहळवी टॉफी...
गोड चविने सरु दे अजुन एक रात्र...
अंधारातच चढायचा आहे एक एक जिना...
हातात हात तेवढा राहू दे फक्त....

... संदीप खरे ...

Friends


Tuesday, July 28, 2009

काय रे देवा.... - by Sandeep khare

by Sandeep khare

काय रे देवा...

आता पुन्हा पाऊस येणार....

आता पुन्हा पाऊस येणार , मग आकाष काळ नीळ होणार,
मग मातीला गंध फुटणार , मग मधेच वीज पडणार,
मग तूझी आठवण येणार, काय रे देवा.....

मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार,
मग मी ती लपवणार,मग लपवुनही ती कुणाला तरी कळावस वाटणार,
मग ते कोणितरी ओळखणार,
मग मित्र असतील तर रडणार , नातेवाईक असतील तर चिडणार,
मग नसतच कळल तर बर, असं वाटणार...
आणि ह्या सगळ्याशी तुला काहीच देण घेण नसणार..
काय रे देवा.....

मग त्याच वेळी दूर रेडियो चालू असणार, मग त्यात एखाद जुन गाण लागलेल असणार्,
मग त्याला एस. डी. बर्मननी चाल दिलेली असणार्,मग साहिल ते नी लिहिलेल असणार्,
मग ते लतानी गायलेल असणार्...,
मग तूही नेमक आत्ता हेच गाण ऐकत असशील का? असा प्रश्न पडणार्,
मग उगाच छातीत काहीतरी हुरहुरणार, मग ना घेण ना देण पण फुकाचे कंदील लागणार्....
काय रे देवा.....

मग खिडक्यांचे गज थंडगार होत जाणार्.., मग त्याला आकाशाची आसवं लगडणार्..,
मग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मूठीवर ते टपटपणार्....,
मग पाच फूट पाच इंच देह अपूरा अपूरा वाटणार , मग ऊरी फुटुन जावसं वाटणार, छाताडातून ह्रुदय काढून त्या शूभ्र धारेखाली धरावासा वाटणार्...,
मग सारं कसं मूर्खासारखं उत्कटं उत्कटं होत जाणार्,
पण तरीही श्वासाची लय फक्त कमी जास्त होत राहाणार, पण बंद नाही पडणार्,
काय रे देवा.....

पाउस पडणार्.. मग हवा हिरवी होणार..मग पाना पानात हिरवा दाटणार्,
मग आपल्या मनाच पिवळ पान देठं मोडून हिरव्यात शीरू पहाणार, पण त्याला ते नाही जमणार्,
मग त्याला एकदम खर काय ते कळणार्, मग ते ओशाळणार्,
मग पून्हा शरीराशी परत येणार, सर्दी होउ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार, चहाच्या पाण्यासाठी फ्रीजमध्ये कुडमुडलेलं आलं शोधंणार्,
एस. डी. चं गाणही तोपर्यंत संपलेलं असणार्,रेडियोचा स्लॉट भरलेला असणार्,
मग तीच्या जागी ती असणार, माझ्या जागी मी असणार्, कपातल वादळं गवती चहाच्या चवीने पोटात निपचीत झालेलं असणार.....
काय रे देवा.....


पाउस गेल्यावर्शी पडला,पाउस यंदाही पडतो.. पाउस पूढच्या वर्शीही पडणार्....
काय रे देवा.....

ही कागदाची होडी - by Sandeep Khare

ही कागदाची होडी

ही कागदाची होडी या झ-यात सोडून दिली न
ती याच अपेक्शेने
की असही होऊ शकेल
की झ-यातून नदी पर्यन्त,
नदीतून खाडीपर्यन्त
आणि खाडीतून समुद्रापर्यन्त जाऊ शकेल ही होडी !
कदाचित पूर्ण भिजणार नाही हिचा कागद
समुद्राशी पोहोचेपर्यन्त
आणि समुद्रातल्या तुफ़ान लाटानाही
लळा लावून तरन्गत राहील ही...
कडाडतील वीजा...लाटान्चे डोन्गर होतील
ख-याखु-या जहाजन्ची शिड फ़ाटून जातील
पण तरीहि या चिमुकलीच गोडुल अस्तित्व
प्रलयावर तरन्गणा-या पिम्पळपानासारख डुलत राहील!
भाबडीच आहे ही आशा
पण शेकडो वर्षाच्या वडापिम्पळाच्य
जमिनीखलि वसाहत केलेल्या मुळासरखि
सजीव आणी लासट...

होडी कगदाचीच आहे...
पण त्यावर लिहिली आहे
सारा जन्म पणाला लावून रसरसलेलीअ
एक कविता....

म्हणून तर
ही कागदाची होडी
या झ-यात सोडून दिली ना
ती...याच...तयारीने.....की....

(नेणीवेची अक्षरे)